संगीता कुऱ्हाडे यांना ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
1 min read
बेल्हे दि.१९:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) चे २१ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी सण २०२५ -२६ चा ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ संगीता कुऱ्हाडे यांना देण्यात आला.
शैक्षणिक कार्यात अनेक वर्षाचा अनुभव असून नेतृत्व, शिस्त, विद्यार्थ्यांसोबतचे संवाद कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याला प्रोत्साहन देणे हा आहे.
या वेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, भारतीय महसूल सेवा अधिकारी मुंबई श्रुती पटाडे, जुन्नर चे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे,एलसीबीचे महादेव शेलार, जुन्नर पंचायत समिती माजी सदस्या अनघा घोडके, बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे,
पक्षी मित्र यश मस्करे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, वल्लभ शेळके, पंकज कणसे, जुन्नर तालुक्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख मोहन बांगर, बेल्हे गावचे माजी उपसरपंच निलेश कणसे, बेल्हे सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास औटी, गुळंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भांबेरे, शिक्षक,
विद्यार्थी, बेल्हे ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य विद्या घाडगे, माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, संस्थेचे संचालक भास्कर पवार, सुरेश सोनवणे, गणेश गुंजाळ, सागर शिंदे, विश्वस्त दावला कणसे यांनी संगीता कुऱ्हाडे यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
