संदीप वाघोले यांना ‘नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार’ प्रदान
1 min read
आळेफाटा दि.१९:- आळे (ता.जुन्नर) येथील प्रसिद्ध कवी, निवेदक, व्याख्याते संदीप वाघोले यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमी तर्फे नुकताच ‘ नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
जागतिक आदर्श शाळा जालिंदरनगर ता.खेड येथे झालेल्या समारंभात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ व ज्येष्ठ साहित्यिक ८९ व्या
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी, अकादमीचे सचिव पुरुषोत्तम सदाफुले,डॉ. संभाजी मलघे, ऍड सतीश गोरडे, श्रमश्री बाजीराव सातपुते, राजेंद्र वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी संदीप वाघोले गेली ३० वर्षांपासून लेखन करत असून त्यांची आजअखेर ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १० पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिल्या असून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते निमंत्रित कवी होते. त्याच्या साहित्यिक कारकिर्दीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी चाळक, जालिंदर डोंगरे, शिवांजली साहित्यपीठ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
