वार्षिक स्नेहसंमेलनात भक्त प्रल्हादाच्या जीवनपटातून समाज प्रबोधन
1 min read
बेल्हे दि.१९:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) चे २१ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी भक्त प्रल्हाद यांचा जीवनपट दाखवणाऱ्या नाटकातून समाज प्रबोधन केले. तसेच बाल चिमुकल्यांनी धार्मिक, पारंपारिक व आधुनिक प्रकारची नृत्य सादर केले.
या वर्षी चा ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ संगीता कुऱ्हाडे यांना देण्यात आला. नववी ची विद्यार्थिनी मृण्मयी औटी हिला ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर अवार्ड मिळाला. यांस अनेक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
२०२४-२५ वर्षात इयत्ता दहावी तसेच बारावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान ही करण्यात आला.
तसेच विद्यालयाच्या मॉडर्न या वार्षिकाचे प्रकाशन आमदार शरद सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जुन्नर तालुक्यात शिक्षणाचा विकास होत आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूलने तालुक्याचे नावलौकिक वाढविला असून शिक्षणाची गंगा विकसित केली आहे असे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी पालकांशी संवाद साधताना म्हटले.
भारतीय महसूल सेवा अधिकारी मुंबईच्या श्रुती पटाडे यांनी विद्यार्थ्यांना माणूस म्हणून चरित्र कसे असावे यावर याची मार्गदर्शन केले. तर एपीआय महादेव शेलार यांनी आई-वडिलांचा आदर राखणे, आई-वडिलांची सेवा करणे, आई-वडिलांचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. शालेय विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व चांगले गुण संपादन करावेत.
दहावीच्या प्रथम क्रमांकाचे गणित विषयात ९८ गुणांचे रेकॉर्ड तोडणाऱ्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे यावेळी महादेव शेलार यांनी जाहीर केले. या वेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, भारतीय महसूल सेवा अधिकारी मुंबई श्रुती पटाडे, जुन्नर चे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे, एलसीबीचे महादेव शेलार,
जुन्नर पंचायत समिती माजी सदस्या अनघा घोडके, बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, पक्षी मित्र यश मस्करे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, वल्लभ शेळके, पंकज कणसे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य विद्या घाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे व माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, संस्थेचे संचालक भास्कर पवार, सुरेश सोनवणे, गणेश गुंजाळ, सागर शिंदे, विश्वस्त दावला कणसे यांचे स्वागत केले व आभार मानले.
तसेच जुन्नर तालुक्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख मोहन बांगर, बेल्हे गावचे माजी उपसरपंच निलेश कणसे, बेल्हे सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास औटी, गुळंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भांबेरे, शिक्षक, विद्यार्थी, बेल्हे ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
