विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या वतीने हिवाळी श्रमदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

1 min read

बोटा दि.२०:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), लोणेरे संलग्न विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हिवाळी विशेष शिबिर दि. ८ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले.हे शिबिर चंदनापुरी, अकलापूर व खंदरमाळ (ता. संगमनेर) या दत्तक गावांमध्ये राबविण्यात आले. सात दिवसांच्या या शिबिरात एनएसएस स्वयंसेवकांमार्फत विविध सामाजिक,

शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. चंदनापुरी येथे चंदनेश्वर विद्यालयाचे राहणे सर यांनी विद्यार्थ्यांना एनएसएसचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी व सेवाभाव याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची जाणीव अधिक दृढ झाली. अकलापूर येथे तळेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक प्रबोधन व व्यसनमुक्ती विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तर खंदरमाळ येथे खंदरेश्वर मंदिरात योगी धर्मनाथजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, शिस्त, सकारात्मक विचारसरणी व आत्मविकासाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमास स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. खंदरमाळ येथेच सरपंच गणेश लेंडे तसेच खंदरमाळ विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद लेंडे यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, ग्रामसर्वेक्षण व आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.हे शिबिर संस्थेचे प्राचार्य डॉ. शिंदे किरण यांच्या मार्गदर्शना खाली, एनएसएस समन्वयक प्रा. योगेश तांबडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापिका शिंगोटे विशाखा, प्रा. किर्वे मेघा व प्रा. कुरकुटे दिपाली यांनी विशेष परिश्रम घेतले.शिबिराच्या समारोपप्रसंगी ग्रामस्थांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, शिस्त, नेतृत्वगुण तसेच आध्यात्मिक व नैतिक मूल्येविकसित होण्यास मोलाची मदत झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!