विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

1 min read

आळे दि.१६:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे या महाविद्यालयांचा दि. २ जानेवारी – ०३ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. अथर्व मंगल कार्यालय या ठिकाणी डॉ. शिवाजी पोखरकर संस्थापक – बाळेश्वर शिक्षण व शेती विकास संस्था यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली.यामध्ये वयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, गायन, सामूहिक गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो अशा विविध कलाप्रकारांचा समावेश होता.११ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या काही क्रीडा स्पर्धांसाठी बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मनोज हाडवळे -संस्थापक पराशर ऍग्रो टुरिझम व कुलदीप मोरे हे प्रोडक्ट मॅनेजर क्लिअराईट फार्मास्युटिकल हैदराबाद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तद्नंतर उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. ३जानेवारी रोजी पुष्प सजावट ही स्पर्धा घेण्यात आली व त्यानंतर उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. विशेष उपस्थित हास्य कलाकार दिव्येश शिरवडकर, संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सचिव विजय पारखे, खजिनदार शिवाजी बांगर, संचालक लक्ष्मण कोरडे, महेंद्र शिंदे, विक्रांत काळे, माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. दुष्यंत गायकवाड, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, प्राचार्या डॉ. रूपाली हांडे आदी मान्यवरच्या उपस्थितीत डॉ. रूपाली हांडे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर केला. संचालक लक्ष्मण कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थित दिव्येश शिरवडकर यांनी आपल्या मनोरंजन कौशल्याचं सादरीकरण केलं. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विशाल फार्मोत्सव २०२५-२६ ची जनरल चॅम्पियनशिप बी फार्मसी अंतिम वर्ष च्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!