नगदवाडी शाळेत लायन्स क्लब शिवनेरीच्या वतीने 45 विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप

1 min read

नगदवाडी दि.१६:- नगदवाडी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत राही नरेंद्र गोसावी या बालिकेच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वी मधील गरीब व गरजू 45 विद्यार्थ्यांना स्वेटर तसेच शाळेतील 182 विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. अशी माहिती क्लबचे माजी अध्यक्ष दिपक वारुळे यांनी दिली. या संपूर्ण उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या सर्व सदस्यांनी आर्थिक योगदान दिले. यावेळी केक ऐवजी पपई हे फळ कापून आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे माजी अध्यक्ष दिपक वारुळे, लायन्स क्लबचे सचिव सह्याद्री भिसे, अजय चोरडिया, अशोक खांडगे, सचिन जंगम, नरेंद्र गोसावी, भाग्यश्री गोसावी तसेच केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे, सदस्य निलेश बढे, विनायक गुंजाळ, अतुल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन केंद्रशाळेतील शिक्षक मंगेश मेहेर, पंडित चौगुले, निलेश शेलार, विद्या वाघ, सुप्रिया अभंग, आशा आरेकर व उज्वला कांबळे यांनी केले.सामाजिक उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर सामाजिक मूल्यांची जोपासना होते असे मत लायन्स प्रथम उपाध्यक्ष सचिन जंगम यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार लायन्स क्लबचे नरेंद्र गोसावी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!