रानमळा येथे रा.से.यो. शिबिराचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.१६:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे रानमळा (ता.जुन्नर) येथे
शनिवार दिनांक 17 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 23 जानेवारी या कालावधीत आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी दिली.या शिबिरामध्ये सायबर सुरक्षा जनजागृती, पाणलोट विकास व पडीक जमीन व्यवस्थापन, महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती,
भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी, सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका, संपूर्ण आरोग्यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे ? इत्यादी विविध विषयावर व्याख्याने होणार आहेत. त्याचबरोबर पाणी, माती परीक्षण व ग्राम सर्वेक्षण, ग्राम स्वच्छता अभियान,
आरोग्य तपासणी शिबिर, मतदार जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती व आरोग्य संवर्धन, वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती अभियान इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.या शिबिरामध्ये सामाजिक जिव्हाळ्याचे उपक्रम गावात सरपंच सविता तिकोणे,
माजी सरपंच सुरेश तिकोणे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्या विशेष सहकार्याने राबविणार असल्याचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले. या शिबिरासाठी संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार,
संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा कविता पवार तसेच सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
