ऊस पाचटापासुन मुल्यवर्धनासह रोजगार निर्मिती व पर्यावरण संवर्धन
1 min read
बोरी दि.१३:- जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातून सूरू झालेला पाचट व्यवस्थापनाचा उपक्रम जिल्हा व राज्यस्तरीय अनुकरणीय मॉडेल म्हणून पुढे येत आहे. बोरी येथील पुष्पा अमोल कोरडे यांनी सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील पहिला राऊंड बेलर खरेदी करून
उस पाचट संकलन व व्यवस्थापनाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधुन श्री गणेशा केला आहे.जुन्नर तालुक्यातील बोरी गावातील पुष्पा अमोल कोरडे यांनी याची सुरवात २०२२ ला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतून महाराष्ट्रातील पहिला राऊंड बेलरच्या सहाय्याने झाली.
याआधी उसाच्या पाचटाच्या चौकोनी गाठीच्या निर्मितीसाठी चौकणी गाठिंचे मशीन वापरण्यात येत असे. यासाठी जास्त मनुष्यबळ लागत असल्याने मजूर टंचाईमुळे मोठ्या गाठी (१५० ते ३०० किलो) च्या मशीन वापरात येऊ लागल्या आहेत. पंजाब व हरियाणाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षीत ३ सिझन करत सर्व अडचणींना तोंड देत
त्यांनी पाचट व्यवस्थापनाच्या संचाची जुळवाजुळव तसेच त्यास जोड देणारी पुरवठा साखळी निर्माण करूण यशस्वी मार्गक्रमना केली आहे. हीच गोष्ट भविष्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अनुसरली जाईल यात काही शंका नाही. पारंपारिक पद्धतीने उस तोडणीनंतर पाचट जाळल्यामुळे निमीण होणारे हवाप्रदूषण,
जमिनीची गुणवत्तेत घट, जैवविविधतेवर परिणाम व कार्बन उत्सर्जन या समस्यांवर या उपक्रमाने प्रभावी उपाय सुचवला आहे.बोरी बुद्रुक गावातुन पंजाब, हरियाणा राज्याच्या धर्तीवर सुरु झालेल्या या पहिल्या प्रयोगामुळे पाचट जाळण्याऐवजी त्याचे शास्त्रीय पद्धतीने संकलन, साठवण व मूल्यवर्धन शक्य झाले आहे.
महाराष्ट्रात प्रथमच राऊड बेलरच्या सहाय्याने उस पाचटाच्या मोठ्या गाठी (१५० ते ३०० किलो) तयार करून कमी कालावधीत जास्त गाठीपासून बायोमास ब्रिकेट,सेंद्रीय खत, कंपोस्ट, बायोचार व अन्य जैवआधारित उत्पादने विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला.यामुळे शेतकऱ्याना पूर्वी टाकाऊ समजल्या जाणाऱ्या
पाचटापासून थेट आर्थिक लाभ मिळू लागला असुन शेतीपूरक उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाचा सामाजिक व आर्थिक परिणामही लक्षणीय आहे. पाचट संकलन, बेलिंग, वाहतुक, साठवण व प्रक्रिया या सर्व टप्प्यांमध्ये स्थानिक युवक, शेतमजूर, शेतकरी सहाय्यता, उत्पादकता गटांना रोजगार संधी मिळत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात स्थलांतरांना आळा बसून स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. पाचट न जाळल्यामुळे हवाप्रदुषणात घट, जमीनीवर सेंद्रीय कर्ब वाढ, मातीची जलधारण क्षमता सुधारणा व हरितगृह वायु उत्सर्जनात बचत होत आहे.
यामुळे शाश्वत शेती, हवामान बदल अनुकूलन व कार्बन यूटिलिटिच्या उद्दिष्टांना हातभार लागत आहे.पुणे येथील बायोफ्यूल सर्कल कंपनीच्या माध्यमातुन त्यांना पुष्पा अमोल कोरडे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर मागच्या वर्षी बोरी बू बायोमास बँक सुरु झाली.
शेतकऱ्याच्या शेतातून गोळा करून संकलन करण्याची त्याची क्षमता २५०० टना पर्यंत पोहचली आहे. रोज सुमारे ६० ते १०० टन पाचट शेतकऱ्यांच्या शेतातून गोळा करून आणण्यात येते. या कामातून साधारणतः १५ ट्रॅक्टर चालक-मालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
दरवर्षी उस तोडणी हंगामा सोबत चालणारी ही यंत्रणा यापुढील काळात मोठ्या स्वरुपात विस्तृत होईल यात शंका नाही. केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतातील कृषी अवशेषापासून उत्पादने, ब्रिकेट्स, पॅलेटस व इतर ऊर्जा उत्पादनापासुन उभी राहणारी यंत्रणा भविष्यात शेटकऱ्यांना नवीन उतपन्नाचे स्त्रोत सुरु करेल यात शंका नाही.
पुष्पा अमोल कोरडे या जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, शारदाताई गोविंद पवार पुरस्कार, महिला किसान पुरस्कार प्राप्त महीला शेतकरी असुन जुन्नर तालुक्यातील पहिल्या ड्रोन पायलट देखील आहेत.
या प्रकल्पात कृषी संचालक विनयकुमार आवटे, दिपक रेंगडे, उपविभागीय कृषीअधिकारी सुनील शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी गणे भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
