320 KM प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने लवकरच धावणार भारतीय बुलेट ट्रेन

1 min read

नवी दिल्ली दि.४:- देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट दिली. 15 ऑगस्ट 2027 पर्यंत भारताला पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या कामाची अपडेट देताना रेल्वे मंत्र्यांनी याचे तिकीट दर किती असतील याची देखील घोषणा केली. 320 KM प्रतितास इतका महाप्रचंड स्पीडने ही बुलेट ट्रेन धावणार आहे.सुरुवातीला ही ट्रेन गुजरातमधील सुरत आणि बापी दरम्यान धावेल. पहिल्या टप्प्यात सुरत आणि बिलीमोरा दरम्यान सेवा सुरू होईल. त्यानंतर वापी ते सुरत असा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. शेवटी, मुंबई ते अहमदाबाद हा संपूर्ण हाय-स्पीड कॉरिडॉर कार्यान्वित होईल. रेल्वेमंत्र्यांनी हलक्या स्वरात लोकांना आतापासूनच तयारी करण्याचे आवाहन केले. 15 ऑगस्ट 2027 रोजी म्हणजेच पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी भारतीय हा पहिल्या बुलेट ट्रेनने प्रवास करतील. पहिल्या टप्प्यात, ही ट्रेन सुरत ते वापी दरम्यानच्या 100 किलोमीटरच्या मार्गावर धावेल. एकदा प्रकल्प पूर्ण झाला की, मुंबई आणि अहमदाबाद या दोन्ही मेट्रो शहरांमधील 508 किलोमीटरचा प्रवास दोन तास 17 मिनिटांत पूर्ण होईल. या ट्रेनचा स्पीड पाहिला असता मुंबई पुणे मार्गावर ही बुलेट ट्रेन धावली असती तर मुंबई पुणे रिर्टन प्रवास 60 मिनिटांत झाला असता. मुंबई ते पुणे 155 KM इतके अंतर आहे. या प्रवासासाठी रेल्वे तसेच हायवेने गेल्यास 4 तासांचा वेळ लागतो.बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरतमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. ही ट्रेन जपानच्या शिंकानसेन हाय-स्पीड ट्रेनच्या धर्तीवर धावेल. तिचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असेल. संपूर्ण प्रकल्पात अहमदाबाद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, ठाणे आणि मुंबईसह एकूण 12 स्थानके असतील. प्रकल्पाचा 85 टक्के भाग, किंवा अंदाजे 465 किलोमीटर, एलिव्हेटेड असेल, ज्यापैकी 326 किलोमीटर पूर्ण झाले आहेत.बुलेट ट्रेनचे भाडे किती असेल याबद्दल आता अनेकांना प्रश्न पडला आहे. ते अद्याप अधिकृतपणे अंतिम झालेले नाही, परंतु प्रारंभिक अंदाज समोर आले आहेत. मुंबई ते अहमदाबाद या संपूर्ण प्रवासाचे भाडे 3000 ते 5000 रुपयांपर्यंत असू शकते. हे भाडे विमान प्रवासापेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!