सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

1 min read

राजुरी दि.२:- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल या शिक्षण समूहाचे संचालक सचिन चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला. शाळा व इंजीनियरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स सचिन चव्हाण यांना भेटवस्तू दिली. गेले दहा वर्षापासून सचिन चव्हाण हे सह्याद्री व्हॅली या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंजीनियरिंग कॉलेज येथे संगणक व तंत्रज्ञान, मेकॅनिकल, सिव्हिल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायर मॅनेजमेंट, एमबीए, असे विविध डिग्री व डिप्लोमा कोर्सेस व सीबीएसई स्कूल सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी विविध तालुका व शाळा अंतर्गत स्पर्धांमध्ये दैदीप्यमान कामगिरी केली आहे. सामाजिक कार्यात देखील सचिन चव्हाण यांचा हिरीरीने सहभाग असतो. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध राजकीय सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. बालरामडू तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी कॉलेज व शाळा यामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!