समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश

1 min read

बेल्हे दि.२:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए),आळेफाटा लोकल ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे मुंबई राज्यस्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये आयपीए आळेफाटा स्थानिक शाखा अंतर्गत विविध महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.स्पर्धेचे विजेतेपद समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे व उपविजेतेपद समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांना मिळाले. तसेच मुलींच्या खो-खो स्पर्धा जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, कुरण येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांनी विजेतेपद पटकावले तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे यांनी उपविजेतेपद पटकावले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून ओंकार ढवळे व ओंकार सोलट यांनी काम पाहिले.क्रीडा समन्वयक डॉ.मंगेश होले,क्रिडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे,क्रीडा शिक्षक प्रा.सुरेश काकडे,आयपीए समन्वयक अजय भागवत,विभागप्रमुख प्रा.नितीन महाले, प्रा.प्रतिक भांड,डॉ.बिपीन गांधीं यांनी आयोजनाची जबाबदारी पार पडली.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी गायकवाड यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.सर्व विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!