विज्ञान प्रदर्शनात १५० प्रकल्पांचे प्रात्यक्षिक
1 min read
बेल्हे दि.१:- मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थांनी एकून १५० प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्बन purification,रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्दत, हायड्रोलिक पुली, earth quake sensor, रस्ता/अपघात सुरक्षा प्रकल्प, remot control tractor hydrolic trolly, rain detector असे विविध प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवले होते.
या प्रयोगात १ ली ते ५ वी या गटात प्रथम क्रमांक चांद्रयान ३ प्रयोगासाठी आरोही घोडे व आरोही झिंजाड यांच्या संयुक्त प्रयोगाला मिळाला. संचित बोरचटे (1st) याच्या Day Night Equator या प्रयोगाला द्वितीय तर अद्विका बांगर हिच्या स्मार्ट डस्टबिन या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
सहावी ते अकरावी च्या गटात प्रथम क्रमांक तन्मय येवले याच्या रिमोट कंट्रोल वर चालणारा ट्रॅक्टर व हायड्रोलिक ट्रॉली या प्रयोगाला तर राजवीर बांगर यांच्या कार्बन पुरिफिकेशन फॅक्टरी या प्रयोगाला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक हा चैतन्य काने याच्या यू – टर्न सेफ्टी मॉडेल व महेक पटेल हिच्या IR सेन्सर स्ट्रीट लाईट या प्रयोगाला मिळाला.
या प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे वैज्ञानिक सिद्धांताची समज विद्यार्थांना मिळवण्यास मदत होणे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करावा हे समजते. यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थांनी विज्ञान व गणिताचे विविध प्रयोग बनवले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी. सिंग, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, साईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ यांनी केले.
