अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ८७ लाखांची मदत मंजूर

1 min read

अहिल्यानगर दि.१:- राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने आज (३१ डिसेंबर २०२५) निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या “सततचा पाऊस” या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी शासनाने निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.✅प्रमुख ठळक बाबी:

जिल्हा: अहिल्यानगर (नाशिक विभाग) नुकसान कालावधी: सप्टेंबर २०२५ (सततचा पाऊस) मंजूर निधी:₹८७,०५,०००/- (सत्याऐंशी लक्ष पाच हजार रुपये)
लाभार्थी शेतकरी : १,८१५ बाधित क्षेत्र : ७७८.३३ हेक्टर१. थेट मदत: ही मदत डी.बी.टी. (DBT) पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.२. बँकेची वसुली नाही: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदत निधीतून बँकांनी कोणतीही कर्ज वसुली अथवा कपात करू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.३. पारदर्शकता: मदतीची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ही मदत २ हेक्टर मर्यादेतील शेतीपिक नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार देण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!