वळसे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्याला क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक
1 min read
निमगाव सावा दि.१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रातील विद्यार्थी प्रथमेश थोरवे (एस. वाय. बी. ए.) यांनी क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले.
नाशिक येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये प्रथमेश थोरवे(दिलीप वळसे पाटील महाविद्यालय, निमगाव सावा) यांनी उत्कृष्ट क्रीडा कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत त्यांनी –
▪️ 100 मीटर धावणे – सुवर्णपदक
▪️ 200 मीटर धावणे – रौप्यपदक
▪️ 4×100 मीटर रिले – सुवर्णपदक
अशी दमदार कामगिरी नोंदवली.
या उल्लेखनीय यशाच्या आधारे प्रथमेश थोरवे यांची बेंगळूर (कर्नाटक) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रथमेश थोरवे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार,
सचिव परेश घोडे, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, य. च. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्याकेंद्र संयोजक प्रा. अनिल पडवळ, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
