पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

1 min read

पुणे दि.१:- पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नागरिकांच्या सोईच्या व हिताच्या दृष्टीने जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हडपसर येथील जागेमध्ये ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याचे काम सुरू होत असल्याने कामकाज पूर्ण होईपर्यंत हडपसर येथील शिबीर दौरा स्थगित केल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वेल्हा (पंचायत समिती विश्रामगृह) येथे ६ जानेवारी, १० फेब्रुवारी, १६ मार्च, २१ एप्रिल, २० मे व १८ जून; उरुळीकांचन (ग्रामपंचायत जिजाऊ सभागृह) येथे ५, १३ व २१ जानेवारी, ४, १२ व २५ फेब्रुवारी, ५, १८ व २५ मार्च, ७, १६ व २८ एप्रिल, ६, १२ व २१ मे, ४, १६ व २६ जून; शिक्रापूर (कोढापूरी विश्रामगृह) येथे १४ व २२ जानेवारी, ११ व १८ फेब्रुवारी, १२ व ३० मार्च, १३ व २२ एप्रिल, १८ व २९ मे, ५ व १५ जून; पिरंगुट (भैरवनाथ मंदिर मैदान) येथे १२ जानेवारी, ९ फेब्रुवारी, ११ मार्च, ८ एप्रिल, ११ मे, ९ जून; शिरुर (विश्रामगृह) येथे ८, २० व २८ जानेवारी, ५, १६ व २४ फेब्रुवारी, १०, १७ व २४ मार्च, ९, १५ व २९ एप्रिल, ५, १३ व २६ मे, १०, १७ व २४ जून; जेजुरी (आयटीआय कॉलेज मैदान) येथे २३ जानेवारी, २७ फेब्रुवारी, २७ मार्च, २४ एप्रिल, २२ मे, २५ जून; सासवड (विश्रामगृह) येथे ९ व १६ जानेवारी, १३ व २० फेब्रुवारी, १३ व २० मार्च, १० व १७ एप्रिल, ८ व १५ मे, १२ व १९ जून; तर भोर (जिल्हा परिषद विश्रामगृह) येथे ७ व १९ जानेवारी, ६ व १७ फेब्रुवारी, ९ व २३ मार्च, ६ व २० एप्रिल, ७ व १९ मे, ८ व २२ जून या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीर दौऱ्याच्या दिवशी जर शासनाची सुट्टी जाहीर झाली, तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या दिवशी किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!