वन्यजीव व मानव संघर्ष विषयावर समर्थ संकुलात मेजर रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन

1 min read

बेल्हे दि.१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे आणि सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर, विभाग पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव व मानव यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.

 

बिबट्या,तरस,रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांशी सामना झाल्यास घ्यावयाची काळजी,अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे महत्त्व,तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य व सुरक्षित वर्तन कसे असावे याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.या कार्यक्रमामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन मानव व निसर्ग यांच्यात सुसंवाद साधण्यास मदत होईल.कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तसेच शंकांचे सविस्तरपणे व सकारात्मक पद्धतीने समाधान केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रणाली साळुंके यांनी तर आभार प्रा.कीर्ती शिंदे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!