५० वर्षांनी दहावी बॅचची सदिच्छा भेट

1 min read

बोरी दि.२९:- न्यु इंग्लिश स्कूल शिरोली बु || ता. जुन्नर जि.पुणे इ १० वी बॅच सन १९७५-७६ सालातील शालेय विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी लक्ष्मण नवले, प्रकाश सरवदे, विष्णू थोरवे यांनी मुंबईतील वर्गमित्रांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आले होते कारण जवळ जवळ अर्धे शतकानी वर्गमित्र यांची नव्याने ओळख भेट म्हणजे शाळेतील नव्याजुन्या आठवणीने आजार दूर करणारे औषध होय प्रत्येकाचे फोन नंबर मिळविणे हे जिकिरीचे काम यशस्वी केले यातून भेटीगाठीने वैचारिक पातळीवर गेट टू गेट निर्मिती होत आहे जे जे वर्गमित्र भेटले त्यांच्यात जिज्ञासा ,आपुलकी वाढीस लागल्याने पुढील उत्सुकता आनंदमय होईल. शालेय जीवनातील विद्यार्थी एकत्र येणे यापेक्षा आनंद कुठला उषा खंडू माळवे यांचे घरी गेले असता एक वेगळा अनुभव आला संसारिक व शालेय जीवनातील अनुभव या गप्पागोष्टीत रमबान झाले होते मुंबईत ज्यांच्या भेटी झाल्या त्यांनी आपापल्या परीने चांगला पाहुणचार केला जेष्ठ साहित्यिक डॉ खंडू रघुनाथ माळवे यांनी “शाळेचे दप्तर” काव्यसंग्रह,व पुस्तिका “अंगाईत” बालसाहित्य सप्रेमभेट देवून सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!