बेल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवा अन्यथा टॉवर वर चढून आंदोलन करू:- कैलास औटी

1 min read

बेल्हे दि.२७:- बेल्हे – जेजुरी हायवे वरील बेल्हे (ता.जुन्नर) येथील बँक ऑफ इंडिया ते बेल्हे बस स्थानका पर्यंत रोज वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास औटी यांनी प्रशासना कडे केली आहे. कैलास औटी यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अडीच वर्षे येथे सतत वाहतूक कोंडी होत असून नागरिक पूर्णपने वैतागले आहेत. ३१ डिसेंबर पर्यंत ही समस्या न सोडवल्यास १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता बँक ऑफ इंडियाच्या इमारतीवरील टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचे कैलास औटी यांनी सबंधित निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!