मातोश्री सायन्स कॉलेजची उत्तुंग भरारी; NEET व CET परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन

1 min read

कर्जुले हर्या दि.३० :-मातोश्री सायन्स कॉलेज,कर्जुले हऱ्या (ता: पारनेर) बारावीच्या निकाल 98.00% लागला असून विद्यार्थ्यांची NEET व CET परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे.

कॉलेजमध्ये १) गवळी प्रज्ञेश भाऊसाहेब : ७४.८३% २) गायके अभिषेक गोविंद : ७१.८३% ३) दिघे प्रणव बापूसाहेब : ७१.५०% ४) पायमोडे निनाद राजेंद्र : ७०.००% ५) छाजेड निशिता निलेश : ६९.८३ % यांचे क्रमांक आलेले आहे. सीईटी परीक्षेमध्ये 70% वरती 42 विद्यार्थी आहे. तसेच नीट परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेले आहे.

त्यामध्ये दिघे प्रणव बापूसाहेब (५८८). गवळी प्रज्ञेश भाऊसाहेब(५२१). ठुबे श्रीशैल्य मुकेश(४६२) या विद्यार्थ्यांनी मातोश्री सायन्स कॉलेजच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. तसेच NEET परीक्षेमध्ये 300 च्या वरती १३ विद्यार्थी आहे. मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते.

तसेच यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या प्रविण्यात भर पडण्यासाठी NEET व CET परीक्षा संदर्भामध्ये गेस्ट लेक्चर, सेमिनार, मार्गदर्शन शिबिर याचे आयोजन केले जाणार आहे.सदर विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापिका मीराताई आहेर, सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष दिपक आहेर,संचालिका डॉ. श्वेतांबरी आहेर, मुख्याध्यापिका शितल आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, रजिस्टार यशवंत फापाळे यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांना प्राचार्य राहुल सासवडे, गणेश हांडे, राजेंद्र साठे,सोनल पायमोडे, राणी रासकर, राहुल भालेकर,सुवर्णा उंडे,अजिंक्य बिडकर, प्रणया बोरीकर, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे