दामदुप्पट आमिष..सायबर गुन्हेगारांनी तब्बल 31 लाख रुपयांना लुटले

1 min read

बेळगाव दि.२३:- सायबर गुन्हेगारीचे प्रकार सुरूच आहेत. गुंतवणुकीच्या दामदुप्पट परतावा देण्याचे सांगून ठकवण्याच्या घटना वाढल्या आहेत.हुलीकोत्तल, ता. खानापूर येथील एका रहिवाशाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 31 लाख रुपयांना गंडवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जिल्हा सायबर क्राईम विभागात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रगौडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील झटपट परताव्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे फसवणुकीची घटना घडली आहे. टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करून घेत शेवटी सायबर गुन्हेगारांनी संपर्कच बंद केला आहे.उपलब्ध माहितीनुसार 23 ऑगस्ट रोजी फेसबुकवर पेटीएम कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीची एक पोस्ट आली होती. पेटीएम मनीमध्ये गुंतवणूक करा, दामदुप्पट परतावा मिळवा, अशी ती पोस्ट होती. या जाहिरातीखाली असलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज गेला. यशस्विनी जिंदाल या नावाने असलेल्या व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाले.सावजाला विश्वासात घेऊन झटपट परतावा देण्याचे सांगण्यात आले.सायबर गुन्हेगारांनी चंद्रगौडा यांच्या नावे एक खाते उघडले. या खात्यात नफा जमा केल्याचे सांगत होते. त्या खात्यातील रक्कमही ऑनलाईन दिसत होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!