राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व एडुस्पार्क इंटरनॅशनल यांच्यात सामंजस्य करार

1 min read

कर्जुले दि.२३:- कर्जुले हार्या (ता. पारनेर) येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि शासन मान्य आयटी फ्री सर्टिफिकेशन व प्लेसमेंट सेवा पुरवणारी एडुस्पार्क इंटरनॅशनल प्रा. लि., रांजणगाव एमआयडीसी, पुणे यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षणा साठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.हा करार दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे प्राचार्य डॉ. राहुलकुमार एस.हिंगोले तर एडुस्पार्क इंटरनॅशनल प्रा. लि. तर्फे निम्बाजी नरवडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.या प्रसंगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मीरा आहेर, संस्थेचे सचिव किरण एल. आहेर, संस्थेचे कार्यकारी अधिकारी, डॉ.दीपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे तसेच उपप्राचार्य व IQAC समन्वयक डॉ. कृपाल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आयटी सर्टिफिकेशन कोर्सेस, इंडस्ट्री-रेडी प्रशिक्षण, कौशल्यविकास कार्यक्रम, इंटर्नशिप व प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता वाढून त्यांना उद्योगजगताच्या गरजेनुसार सक्षम करण्यास मोठी मदत होणार आहे.या सामंजस्य करारामुळे महाविद्यालय व उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी नवे दालन खुले झाले आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!