कवी अशोक उघडे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
1 min read
साकोरी दि.२०:- जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील ज्येष्ठ कवी अशोक उघडे यांना नवी दिल्ली येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने देशातील अनेक राज्यातील कवी,
कलाकार पत्रकार नाटककार लेखक यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एस.पी सुमनक्षर यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री संघ प्रिय गौतम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दिल्लीतील झरोंदा पंचशील भवन येथे 12 व 13 डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील आखाडे सर,अशोक वाघमारे, रविंद्र भोजने, अलका खोसे यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने गौरवण्यात आले.
