शेतात गायी चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
1 min read
पौड दि.१७:- गायी चरण्यासाठी शेतात गेलेला युवक पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना जामगाव, ता.मुळशी इथे घडली आहे. दत्ता एकनाथ सुर्वे (वय अंदाजे ३५, रा.जामगाव, ता.मुळशी, जि. पुणे) असे युवकाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेबद्दल सरपंच विनोद सुर्वे यांनी माहिती दिली.
दत्ता एकनाथ सुर्वे हा युवक काल दुपारी गायींना चरण्याण्यासाठी शेताकडे गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पौड पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा माहिती दिली असता सकाळी शोध घेण्यात आला. त्यावेळी टाटा कंपनीच्या खाणीतल्या पाण्याजवळ चप्पल, काठी व गमछा सापडला.
स्थानिक सरपंच विनोद सुर्वे यांनी लगेच अमित कंधारे यांना कळवले. कंधारे यांनी तातडीने तहसीलदार विजय कुमार चोबे यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, हनुमंत नवले व स्थानिक कार्यकर्ते यांनी शोध घेऊन एक तासात मुतदेह पाण्यातुन बाहेर काढून
ग्रामीण रुग्णालय पौड येथे पाठवला. तेथील डॉ.राऊत यांनी मयत झाल्याचे जाहीर केले. पुढील अधिक तपास पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष दावलकर करत आहेत.
