मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम

1 min read

मुंबई दि.१७:- राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाने कायम ठेवली आहे. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. आता जिल्हा सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. कनिष्ठ न्यायालयात शिक्षा झाल्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळाल्याने त्यांचे मंत्रिपद तेव्हा वाचलेहोते. शिक्षेला त्यांनी केलेल्या आपीलाचा निर्णय विरोधात गेल्याने पुन्हा मंत्रिपद धोक्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!