फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन

1 min read

नागपूर दि.१५:- विदर्भातील संत्री व लिंबू वर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नागपूर येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन)अधिनियम १९६९ मध्ये लिंबूवर्गीय फळपिकांच्या अनुषंगाने सुधारणा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. विदर्भातील संत्री, मोसंबी व लिंबूवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे, तसेच या प्रदेशातील फळ उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दर्जा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने शासन पातळीवर ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्य मंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त कृषी सूरज मांढरे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!