पुणे-नाशिक रेल्वेमार्ग ‘शिवजन्मभूमी-जुन्नर’ मधूनच व्हावा:- माजी आमदार अतुल बेनके

1 min read

पुणे डि.१६:- पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्नरमधून व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘पुणे-नाशिक रेल्वे बचाव कृती समिती, जुन्नर’ यांच्या नेतृत्वाखालील ‘सर्व पक्षीय जन आक्रोश आंदोलन’ आज अत्यंत प्रभावीपणे व शांततापूर्ण मार्गाने पार पडले.जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला ऐतिहासिक तालुका आहे. आणि या भागाला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास या भागाचा ऐतिहासिक आणि पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होईल. तसेच जुन्नर, आळेफाटा आणि परिसरातील कृषी, औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी रेल्वेमार्ग अत्यावश्यक आहे, ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्नर मार्गेच निश्चित करण्यात यावा आणि जुन्नर मार्गाचा पर्याय अंतिम करून त्याबाबतची शासकीय घोषणा त्वरित करावी.शासनाने या जनभावनेचा आदर करावा आणि कोणताही विलंब न करता, पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला जुन्नरमधून नेण्यासाठी त्वरित सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!