माळशेज रेल्वे मार्गाला तातडीची मंजूरी द्या:- निलेश लंके
मुंबई दि.१६:– पुणे – नाशिक या तीन प्रमुख विभागांना थेट जोडणारा अहिल्यानगर–माळशेज घाट–कल्याण (२४६ किमी) हा नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक, कृषी, पर्यटन व लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी चालना देणारा ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित असल्याने मुंबई–नाशिक–मनमाड आणि पुणे–दौंड–अहिल्यानगर या मार्गांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम मालवाहतूक खर्चावर आणि गुंतवणुकीवर होत आहे. याबाबत खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे स्पष्ट मागणी केली आहे की
▪️ या रेल्वे मार्गाला तात्काळ अंतिम मंजुरी द्यावी
▪️ २०२५–२६ आर्थिक वर्षात निधी वाटपाचा पहिला टप्पा जाहीर करावा
▪️ माळशेज घाट बोगदा प्रकल्पाच्या डीपीआरला तांत्रिक मंजुरी द्यावी
▪️ या मार्गाचा ‘विशेष रेल्वे प्रकल्प’ श्रेणीत समावेश करावा
हा मार्ग सुरू झाल्यास
_ अहिल्यानगर–मुंबई–मराठवाडा–विदर्भ संपर्क अधिक सक्षम होईल
_दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी पूरक रेल्वे मार्ग उपलब्ध होईल
_ बंदरांशी निगडित मालवाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल
_ कृषी, एमएसएमई, उद्योग व पर्यटन क्षेत्राला गती मिळेल
राज्य व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक आहे.अहिल्यानगरसह संपूर्ण मध्य महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय या रेल्वे मार्गामुळे सुरू होईल, असा मला ठाम विश्वास आहे.
