‘भारतात डिजिटल जनगणना होणार’
1 min read
मुंबई दि.१३:- अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितलं की, “२०२७ ची जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असेल. डेटाची सुरक्षितता लक्षात घेऊन जनगणनेची डिजिटल रचना करण्यात आली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात केली जाईल. पहिला टप्पा १ एप्रिल ते सप्टेंबर २०२६ पर्यंत असेल.
दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. १ एप्रिल ते सप्टेंबर २०२६ पर्यंत घरांची यादी आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल. या डिजिटल जनगणनेच्या माध्यमातून मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे डेटा गोळा केला जाईल. तसेच हे अॅप्लिकेशन हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये असेल”, असं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे.
