सह्याद्री व्हॅली मध्ये एस.व्ही कॉलेज ऑफ फायर सेफ्टी अंतर्गत ३ नवीन अभ्यासक्रमांना परवानगी
1 min read
बेल्हे दि.९:- राजुरी (ता. जुन्नर) येथील सहयाद्री व्हॅली शैक्षणिक संकुलामध्ये एस.व्ही कॉलेज ऑफ फायर सेफ्टी अंतर्गत १) प्रगत पर्यावरण अभियांत्रिकी पदविका (ईझेड) पात्रता-बीएससी किंवा डिप्लोमा २) प्रगत अग्निशमन सेवा अभियांत्रिकी पदविका (एफआर), पात्रता-१२ किंवा आय.टी.आय. ३) प्रगत औद्योगिक सुरक्षा पदविका बीएससी किंवा डिप्लोमा ही पात्रता असणार आहे.

हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र शासनाची परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण प्राचार्य डॉ. संजय झोपे आणि उपप्राचार्य पी. बलराम यांनी दिली.

प्रगत पर्यावरण अभियांत्रिकी पदविका, प्रगत अग्निशमन सेवा अभियांत्रिकी पदविका (एफआर), व प्रगत औद्योगिक सुरक्षा पदविका) सदर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता प्रत्येकी ४० असणार आहे. हे अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त आहेत.
सदर अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता आय.टी.आय, १२ वी, बीएससी किंवा डिप्लोमा अशी असणार आहे असे प्राचार्य डॉ. संजय झोपे यांनी सांगितले. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फायर सेफ्टी ऑफिसर, औद्योगिक सुरक्षा ऑफिसर आणि पर्यावरण इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.

यापूर्वी एम .बी. ए. (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) व बीसीए (बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) सहयाद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, अंतर्गत मेकॅनिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग,
कॉम्प्युटर इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इत्यादी प्रकारचे अभ्यासक्रम सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सॉफ्ट स्किल व संभाषण कौशल्य चे प्रशिक्षण दिले जाते. अनेक शैक्षणिक व व्यवसायाभिमुख उपक्रम सह्याद्री व्हॅली शैक्षणिक संकुलामध्ये सातत्याने राबवले जातात.

सदरचे अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आय.टी.आय, १२ वी, बीएससी किंवा डिप्लोमा नंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ. संजय झोपे यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी प्रवेश सुरू झाले असून प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी ९७६७५८०००० / ९७६७५९०००० आणि 8308828191 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.

