१३ तोळ्यांसह अडीच लाख घेऊन विवाहितेचे तरुणासोबत पलायन
1 min read
करंजी दि.९:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लोहसरमधील विवाहीत महीला सव्वा वर्षाच्या मुलासह शुक्रवारी रात्री अचानक गायब झाली. तेरा तोळे व अडीच लाखाची रोकड घेवून तिने तरुणासोबत पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पसार झालेल्या विवाहिताचा पती शुक्रवारी रात्री अहिल्यानगरला आला होता. सासू-सासरे घरात टिव्ही पाहत बसले होते. घराच्या पाठीमागील दरवाजाने विवाहित मुलाला घेवून पसार झाली. ज्या तरुणासोबत ती पसार झाली.करंजी परिसरातील हा तरुण कापड दुकानात कामाला असल्याचे समजते.
पसार होताना विवाहितेने घरातील कपाटातून १३ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड घेवून गेल्याचे समोर आले आहे. विवाहितेच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत तिचा शोध घेण्याची मागणी केली आहे.पसार झालेल्या विवाहितेचा पती शेतकाम करून उदरनिर्वाह करतो.
या महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. फोनवरून ते एकमेकांच्या संपर्कात आले अन् थेट पसार होण्याची योजना आखली, अशी माहिती आता समोर येत आहे.ज्या तरुणासोबत विवाहिता पसार झाली तो बहिणीकडे आश्रयाला होता.
बहिणीकडे राहून तो करंजीत कापड दुकानात काम करत होता. त्यांचे बर्तन अनेकांच्या डोळ्यात भरणारे होते. ज्या कुटुंबातील विवाहिता त्याच्यासोबत गेली ती सामान्य कुटुंबातील असल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
