आनंद वार्ता; पुण्यात मान्सून दाखल; पुणे शहरात पाऊस
1 min readपुणे दि.२४:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा २३ व २४ जुन या दोन दिवसात राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो आज खरा ठरला असून अखेर आज सकाळी पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बसरल्या आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मध्यम हलक्या पावसाच्या सरी पुणे शहरात बरसत आहेत.
पुणे शहरातल्या उपनगर भागात तसेच शहरातल्या कात्रज, सिंहगड रोड, बाळजीनागर, सहकारनगर, सदाशिव पेठ आणि अन्य शरतल्या ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात मान्सून सुरू होण्याची तारीख १० जून होती, तर मुंबईसाठी ११ जून होती. पण बिपरजॉय या वादळामुले मान्सून येण्यास विलंब झाला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासून पुण्यात पावसाच वातावरण आहे. त्यासोबतच पाऊस गेल्यानंतरही ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या शहरात पावसाची सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या भागात देखील पावसाला चांगली सुरवात झाली आहे. तर येत्या ४८ तासात राज्यातल्या सगळ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.