…तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा:- उद्धव ठाकरे

1 min read

मुंबई दि.७:- महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नाही. याच मुद्यांवरून उद्धव ठाकरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद रद्द करा’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.“महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव, वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अ‍ॅनाकोंडा. आता या अ‍ॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.“महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत.तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव, वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अ‍ॅनाकोंडा. आता या अ‍ॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!