निमगाव सावा च्या गुणवंत ५ शिक्षकांना निरोप

1 min read

निमगाव सावा दि.७:- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा या ठिकाणी, शाळेतून बदलून गेलेल्या ५ गुणवंत शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ पटेल यांनी दिली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणपत घोडे गुरुजी माजी मुख्या. व विद्यमान शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निमगाव सावा, शालेय व्यवस्थापन समिती विद्यमान अध्यक्ष मोहम्मद हनीफ पटेल, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आयनूर शेख,स्वामी पतसंस्था चे चेअरमन विजय गाडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष परेश घोडे, जाकीर पटेल, इरफान पटेल, गणेश थोरात गावातील प्रतिष्ठित नागरिक विजय गाडगे, माजी मुख्या. चंद्रकांत जावळे, डॉ. किरण भांगरे, परशुराम लगड-अध्यक्ष तंटामुक्ती समिती, किरण गोत्राळ, माजी ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गाडगे, संदीप आग्रे, तानाजी मुळे, साजिद पटेल, मुमताज पटेल, अंगणवाडी शिक्षिका मंगल बोर्हाडे व ढमाले, साजिदा पटेल आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.निरोपार्थी शिक्षक लहू गोफने, संतोष साळुंके, जयश्री जावळे, शारदा मटाले व प्रशाली डुकरे या सर्व शिक्षकांचा छान ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेत यावर्षी नव्यानेच रुजू झालेले शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे, उपशिक्षक बाळासाहेब राजगुरू, दत्तात्रय हाडवळे, प्रभाकर गुंजाळ, संतोष वाघोले व पुष्पा गुंजाळ या सर्व नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी, शाळेतील शिक्षिका आशा चुकाटे व शोभा गोंदके व ग्रामस्थ विजय घोडे, किरण गोत्राळ, डॉक्टर किरण भांगरे व आदर्श शिक्षक चंद्रकांत जावळे गुरुजी आदी मान्यवरांनी निरोपार्थी शिक्षकांना मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक बाळासाहेब राजगुरू यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संतोष वाघोले, शोभा गोंदके,आशा चुकाटे व पुष्पा गुंजाळ व मंगल आग्रे यांनी केले.सर्व शिक्षकांना उत्तम प्रतीचे पेन डॉ. किरण भांगरे यांच्या वतीने देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना निरोपार्थी शिक्षिका शारदा मटाले व सर्व शिक्षकांच्या वतीने लाडूचे वाटप करण्यात आले. आभार व्यक्त करण्याचे काम दत्तात्रय हाडवळे यांनी केले. अशी माहिती आमचे प्रतिनिधी अजित गाडगे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!