बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिलीप वळसे महाविद्यालयात अभिवादन
1 min read
निमगाव सावा दि.६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, तसेच संस्था प्रतिनिधी कविता पवार, निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे, सचिव परेश घोडे रानमळाचे सरपंच सुरेश तिकोणे, बाळासाहेब गाडगे, गाडगे नाना उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापकवर्ग आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. या चित्रफितीद्वारे त्यांच्या महान कार्याचा, सामाजिक सुधारणा चळवळीतील योगदानाचा आणि भारतीय संविधान
निर्मितीतल्या भूमिकेचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल पडवळ यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी संत गाडगेबाबा व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रा. सुभाष घोडे यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रा.से.यो. विभाग प्रमुख प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले.
