रुब्रिक्स आयटी सोल्यूशन्स व राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार
1 min read
कर्जुले हर्या दि.६:- राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जुले हर्या (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे उद्योग–शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. पुणे येथील Rubrixx IT Solutions Pvt. Ltd. आणि महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) औपचारिकरित्या संपन्न झाला.
या करारावर Rubrixx IT Solutions Pvt. Ltd., Pune चे संचालक डॉ. एस. के. शिंपी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार एस. हिंगोले यांच्या हस्ते स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या MoU मुळे विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, प्रोजेक्ट गाईडन्स, तांत्रिक कार्यशाळा आणि प्लेसमेंट संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रसंगी बोलताना डॉ. एस. के. शिंपी यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगितले. प्राचार्य डॉ. राहुलकुमार हिंगोले यांनी या करारामुळे विद्यार्थी आयटी क्षेत्रातील नवनवीन तांत्रिक कौशल्यांशी अधिक परिचित होतील, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास सचिव किरण आहेर, अध्यक्ष मीरा आहेर, सीईओ डॉ. दीपक आहेर आणि खजिनदार बाळासाहेब उंडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.रुब्रिक्स आयटी सोल्यूशन्स आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातील हा MoU विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी नवे दरवाजे उघडणारा ठरणार आहे.
