कोपरगांव – बीड चालत्या बसमध्ये झाले शॉर्टसर्किट!

1 min read

नेवासे दि.२९:- महाराष्ट्र राज्य परिवहन महा – मंडळाची कोपरगांव – बीड ही बस नेवाशाहून बीडकडे जात असतांना नेवासे येथील पावन गणपती समोर चालू गाडीत अचानक शॉर्टसर्कीट झाल्यामुळे बसमधील प्रवाशांनी मोठी प्रचंड आरडा – ओरड केल्यामुळे या परिसरातील नागरीकांनी बसकडे धाव घेवून बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी प्रवासी माञ प्रचंड गडबडून केलेले होते.याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार (दि.२८) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची कोपरगांव – बीड (क्र.एम.एच.४० ए क्यु ६०२७) ही बस बीडकडे जात असतांना येथील पावन गणपतीसमोर चालत्या बसमध्ये शॉर्टसर्किट झाल़्यामुळे बसमध्ये प्रचंड धुर झाला आणि प्रवाशांनी एकच आरडाओरड केली चालकाने ही बस प्रसांगवधान पाहून रस्त्याच्याकडेला घेतली बसमधून धूर निघत असल्यामुळे परिसरातील नागरीकही प्रचंड घाबरुन गेलेले होते. उपस्थित नागरीकांनी प्रवाशांना सुखरुप खाली घेतले त्यानंतर नेवासा – आगाराच्या दुसऱ्या बसमधून प्रवाशीपुढे मार्गस्थ झाले या घटनेने बसमधील प्रवासी अन् परिसरातील नागरीक माञ या घटनेमुळे प्रचंड घाबरुन गेले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!