दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.२३:- दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग व सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रमात केले.गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा येथे दिवीजा फाउंडेशनतर्फे ग्लोबल पीस ऑनर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनिल जोधा, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांना ‘ग्लोबल पीस ऑनर’ने गौरवण्यात आले.२६/११ या काळजाला भिडणाऱ्या घटनेला १७ वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही सर्वांच्या मनात कायम आहे. मुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २६/११ हल्ल्यात मुंबईची संस्कृती,तिचा आत्मा आणि ओळख लक्ष्य करण्यात आली होती. पण मुंबई थांबली नाही आणि खचली नाही.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दिलेले उत्तर हे देशाच्या बदललेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह बॉलिवूडमधील कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!