इच्छुक उमेदवार धास्तावले; निवडणुका लांबण्याची चर्चां;२५ नोव्हेंबरला सुनावणी
1 min read
पुणे दि.२३:- पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुणे महापालिकेच्या निवडणुका चार महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार चांगलेच धास्तावले आहेत.राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ डिसेंबरला २४६ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतींसाठी मतदान होईल.
मात्र,न्यायालयाने वारंवार दाखवलेल्या नाराजीमुळे नामांकन प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता वाढली आहे.सद्यःस्थितीत काही राजकीय पक्षांतील उमेदवारांनी आपले चार उमेदवारांचे पॅनेलदेखील तयार केले आहे. त्यामुळे राजकीय निवडणुकांचा आखाडा रंगात आलेला आहे. आता काही झाले तरी जानेवारी महिन्यात निवडणुका न होता.
मे किंवा जून महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज उमेदवारांचा हिरमोड झाला असून,कधी लागणार निवडणुका, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जाऊ
लागला आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७टक्के ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करत नाहीत,
अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने यासंबंधी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी म्हणजे २५ नोव्हेंबरला ठेवली आहे. यामुळे ही सुनावणी होईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकांच्या घोषणा सगार नाहीत,
के स्पष्ट झाले आहे. या घोषणा झाल्याशिवाय महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार नाही. १७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ नका, असा इशारा राज्य सरकारला दिला होता.
बांठिया आयोगाच्या २०२२ च्या अहवालातील २७ टक्के आरक्षणाची शिफारस अद्याप न्यायालयीन विचाराधीन असल्याने, आयोगाने पूर्वस्थितीनुसारच निवडणुका घ्याव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. काही स्थानिक संस्थांत आरक्षण ७० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दावे करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने राज्याला नोटीसही बजावली आहे.
महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार नाही, याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे.मात्र, जर सुनावणी झाली आणि त्यावर निर्णय झाला तर ३१ जानेवारीपूर्वीच निवडणुका घेतल्या जातील असाही दावा केला जात आहे. या सर्व गोंधळामुळे इच्छुक उमेदवारांचा गोंधळा उडाला असून संभ्रमात पडले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
जानेवारी महिन्याअखेरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्ययाालयाने दिले आहेत. परंतु, पुणे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.
त्यानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका १९ डिसेंबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पालिका निवडणूक लाबंणीवर पडेल असा दावा केला जात होता.आता पुन्हा न्यायालयाने विचारणा केल्यानंतर या कार्यक्रमात मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काहींच्या मते निवडणूक थेट मे किंवा जून महिन्यात जाईल.
