सातत्य,एकाग्रता, जिद्द, अभ्यास करण्याची उमेद च्या जोरावर ‘सूर्याच्या’ तिघांची सैन्य दलात निवड
1 min read
आळेफाटा दि.२२:- जिद्द असेल तर यश लांब नसते हे वाक्य खरे ठरवले आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सूर्या करिअर अकॅडमीच्या शिवम बाळासाहेब थोरात (अळकुटी), रोहन रमेश लामखडे (बोटा – केळेवाडी), मंगेश आदिनाथ शिंदे (जामगाव पारनेर) या तिघांनी. २१ नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालात तिघांची सैन्य दलात निवड झाली आहे.
भारतीय सैन्य दलात नोकरी करून देशसेवा करण्याची तिघांची इच्छा पूर्ण झाली आहे. या तिघांनी वर्षापूर्वी सूर्या करिअर अकॅडमीत प्रवेश घेऊन अडचणींवर मात करत, मैदानी व लेखी परीक्षेची तयारी करून यशाचा पल्ला गाठला आहे.
१९ -२० वयाच्या या तरुणांची सैन्य दलात निवड झाल्यामुळे सूर्या करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मदने यांनी तिघांचे अभिनंदन केले.शेतीवर तिघांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिघांनी कसून मेहनत घेतली.
पोलिस किंवा सैन्य दलात जाऊन देश सेवा करण्याचं स्वप्न मनाशी घट्ट धरून सुर्या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. या वेळी शिवम, रोहन, मंगेश यांनी बोलताना सांगितले की, सुर्या अकॅडमी यशाचे खरे व्यासपीठ आहे. सुर्या अकॅडमीमध्ये सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत्या.
मैदान, क्लासरूम, अभ्यासिका, हॉस्टेल यामुळे वेळ व शक्ती यांचे उत्तम नियोजन करता आले.प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षांचे आयोजन व मैदानी चाचणीचे डेमो यामुळे आत्मविश्वास वाढीस लागला. विशेष म्हणजे लेखी परीक्षेसाठी संस्थापक श्रीकांत मदने यांनी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम चार्ट तयार करून दिला.
जो अत्यंत फायदेशीर ठरला. मदने सरांनी वडिलांसारखी काळजी घेतली, मोठ्या भावाप्रमाणे पाठिंबा दिल्याने आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो. अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये शिस्तीला अतिशय महत्त्व आहे. शिस्तीच्या बाबतीत खूप ‘कडक’ वातावरण असूनही तिघांनी जिद्दीच्या जोरावरच यश संपादन केले आहे.
प्रतिक्रिया
“कठीण परिस्थितीमध्ये या तिघांनी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सातत्य, एकाग्रता, अभ्यास करण्याची उमेद या तिघांमध्ये होती. या जोरावर त्यांनी यश मिळवले असून त्यांच्या यशामुळे अनेक ग्रामीण भागातील तरुण – तरुणींना प्रेरणा मिळणार आहे.”
श्रीकांत मदने, संचालक सूर्या करियर अकॅडमी
