सकाळ स्कूल ऑलिम्पिक्स २०२५ मध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या नेमबाजांची दमदार चमक
1 min read
वडगाव कांदळी दि.२१:-अंजली भगवत शूटिंग अकॅडमी, पुणे येथे दिनांक 16 व 17 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या Sakal School Olympics 2025 Shooting Competition मध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरीची नोंद करत शाळेचा अभिमान उंचावला.
या स्पर्धेत इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी आराध्या गणेश हाडवळे हिने अंडर-१४ गटात उल्लेखनीय नेमबाजी कौशल्य दाखवत रौप्य पदक पटकावले. तिच्या या यशाने तिच्या मेहनतीला आणि चिकाटीला सुंदर उजाळा मिळाला.
तसेच इयत्ता नववी ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी प्रविण पटाडे हिने अप्रतिम कामगिरी सादर करत अंडर-१४ गटातील सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या खेळजगताला नवी दिशा आणि बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, अंडर-१६ गटात व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकून विजयाची परंपरा भक्कमपणे कायम ठेवली आहे. यामुळे शाळेतील नेमबाजी प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम अधोरेखित झाले.
दोन्ही विद्यार्थिनींच्या ऊर्जस्वित यशाबद्दल शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक किशोर काकडे यांचे विशेष कौतुक केले.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
