व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या सलोनी डुंबरे चा तृतीय क्रमांक; उत्कृष्ट गणितीय कौशल्य सादर

1 min read

वडगाव कांदळी दि.२१:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील विद्यार्थिनींनी विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेचा गौरव पुन्हा एकदा वृद्धिंगत केला आहे.नारायणगाव येथे “अक्षरशिल्प “अकॅडमी तर्फे आयोजित गणित विषय अभ्यास स्पर्धेत इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी सलोनी डुंबरे हिने उत्कृष्ट गणितीय कौशल्य सादर करून तृतीय क्रमांक मिळवला. तिच्या विश्लेषणशक्ती, वेगवान गणना आणि संकल्पनांवरील प्रभुत्वामुळे परीक्षकांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले. सलोनीच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवा आयाम प्राप्त झाला आहे.तसेच इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी गौरी पाचपुते हिने “प्रो ऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन” या स्पर्धेत पुणे येथे प्रादेशिक स्तरावर चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राविण्याचे मानकरीपद पटकावले. तिची अचूकता, एकाग्रता आणि जलद गणना कौशल्य हे या यशाचे मुख्य आधार ठरले. छोट्याशा वयात मिळवलेले हे प्राविण्य तिच्या उज्ज्वल भविष्यास दिशा दाखवणारे ठरले आहे.या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सलोनी आणि गौरीच्या प्रतिभेचे विशेष कौतुक केले असून त्यांनी म्हटले की, “आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांतील उत्कृष्ठ कामगिरी ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांनीही या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!