वीस दिवसांत अकरा बिबटे जेरबंद

1 min read

जांबुत दि.५:-मागील वीस दिवसांत शिरूरच्या बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडवर आलेल्या वनविभागाकडून पिंजरे लावण्यात येत आहेत. जांबुत (ता. शिरूर) येथील भागुबाई जाधव या वृद्धेचा बिबट्याच्या हल्ल्यात ज्या घटनास्थळावर मृत्यू झाला. तेथील थोरातवस्ती घटनास्थळावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मादी संवर्गातील साडेतीन वर्षीय वयाचा बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.आजपर्यंत वीस दिवसांत आकरा बिबटे जेरबंद करण्यात आली असून एक बिबट्या ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे.जांबुत (ता. शिरूर) येथील बिबट्याला पिंपरखेड येथील बेस कॅम्प येथे ठेवण्यात आले असून पिंपरखेड परिसरात आंबेवाडी येथे रोहन बोंबे याच्या घटनास्थळापासून एक किलो मिटर अंतरावर उसाची तोड चालू असलेल्या शेतातील महिला ऊसतोड कामगारावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुपारी दोन वाजेच्या सुमारास मेंढपाळ भाऊसाहेब ठोंबरे यांचे घोडीवर झडप मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून असलेल्या ठोंबरे यांनी जोराचा आरडा ओरडा केल्याने बिबट्याने शेजारील उसाचे शेतात धूम ठोकली तर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास देऊबाई शिंदे या महिला घराच्या अंगणात जनावरांना चारा घालत असताना वीस फूट अंतरावरून डरकाळी फोडल्याने देऊबाई शिंदे या भयभीत होऊन घरात पळ काढला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून आपण थोडक्यात बचावल्याचे त्यानी सांगितले.या घटनाक्रमांची माहिती वनविभागाला देण्यात आल्यावर लगेचच वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले असून स्थानिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस व वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!