आमदार रोहित पवार यांची भाजपावर टीका

1 min read

जामखेड दि.६:- आमदार रोहित पवार यांची भाजपावर टीका केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल दिल्लीतल्या इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी हरियाणा फाईल्स नावाने मतचोरीचे कथित पुरावे सादर केले. हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर २२ वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा”, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!