संतवाडीत विविध विकास कामांचे उद्घाटन
1 min read
बेल्हे दि.६:- पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसेच भाजपा नेत्या आशा बुचके यांच्या निधीतून मंजूर झालेला विविध विकास कामांची उद्घाटने आशा बुचके यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी आरोग्य केंद्रासाठी ६५ लक्ष , साकव पूल ५० लक्ष, अंगणवाडी इमारत १० लक्ष,
स्मशानभूमी सुशोभिकरण करणे १० लक्ष रूपयांच्या कामांची उद्घाटने यावेळी करण्यात आली. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे, आळे गावचे सरपंच मुकुंद भंडलकर,संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, उपसरपंच स्मिता पाडेकर, मंगेश काकडे, जीवन शिंदे,
राकेश शेळके, देविदास पाडेकर, मंगेश निमसे, रामदास शेळके,गणेश निमसे तसेच आळे संतवाडी कोळवाडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश गुंजाळ यांनी केले व आभार सरपंच नवनाथ निमसे यांनी मानले.
