‘सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल का’?

1 min read

आणे दि.२६:- ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल का’? असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. यंदा राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदा ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? असे म्हणण्याची वेळ न येता ‘सांग सांग भोलानाथ पाऊस जाईल का’? असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. नंदीवाले सध्या दारोदारी जात असून लोक त्यांना ‘भोलानाथ पाऊस जाईल का? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. परंतु या प्रश्नाचा सराव नंदीला नसल्याने याचे उत्तर काही नंदीला देता येत नाही. अनेक वर्षातून यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नंदीला सुद्धा यंदाचा पाऊस कधी जाईल. याचा संभ्रम निर्माण झाली आहे.जुन्नर तालुक्यातील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे.यंदा मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती तर दिवाळी झाली तरी सुद्धा पाऊस सुरू आहे. शुक्रवार दि.२४ व शनिवार दि.२६ रोजी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.रविवार दि.२६ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते.——
प्रतिक्रिया
‘आम्ही पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय करतो परंतु यापूर्वी असा केव्हा अनुभव आला नाही. परंतु यंदा नंदीला पाऊस कधी जाईल असा प्रश्न विचारत आहेत.

सदाशिव फुलमाळी
नंदीवाले,आळेफाटा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!