हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा:- प्रमोद खांडगे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना
1 min read
नारायणगाव दि.२६:- पावसामध्ये धना,मेथी भिजते, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यामुळे उपबाजार समिती नारायणगाव या ठिकाणी डोम टाकण्यात यावे. जुन्नर, नारायणगाव आळेफाटा ओतूर या ठिकाणी सोयाबीन शासनामार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व अंगीकृत शेतकरी संघटनांची मागणी – प्रमोद खांडगे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर अनेक दिवसांपासून जुन्नर बाजार समिती,उपबाजार समिती नारायणगाव, आळेफाटा,ओतूर या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी आहे.
परंतु या मागणीकडे आपली बाजार समिती दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे.उपबाजार समिती नारायणगाव या ठिकाणी धना,मेथीचे मार्केट सुरू आहे.मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्हा,नगर जिल्हातुन शेतकरी मोठ्या प्रमाणात धना,मेथी इतर भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग धना,मेथी भाजीपाला योग्य भावामध्ये खरेदी करतात.शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतात.परंतु या ठिकाणी उघड्यावर धना,मेथीचा लिलाव होत असतो त्यामुळे अचानक अवकाळी पाऊस आल्यावर शेतकऱ्यांची तारांबळ उडते.
पावसाने भाजीपाला भिजल्यानंतर त्याचे मार्केट पडते व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामध्ये व्यापाऱ्यांचे आडतदारांचे देखील मोठे नुकसान होते.या ठिकाणी डोम टाकणे अत्यंत गरजेचे आहे.अनेक वेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही यासंबंधीत मागण्या केल्या परंतु आपण त्याचे कुठल्याही उत्तर दिले नाही.
बाजार समितीमध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये चालू आहेत परंतु गाळेधारक व्यवसायकांचे यासंबंधी म्हणणे असे आहे की धना,मेथीचे मार्केट या ठिकाणी असल्यावर आमचा व्यापार चांगला होतो व मार्केट बायपासला नेल्यावर या ठिकाणी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होतो.
त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील उपासमारीची वेळ येऊ शकते. यासंबंधी देखील सर्वांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला पाहिजे,मार्ग काढला पाहिजे.संघटनेच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना आपण केराची टोपली दाखवत आहात. आपण याचा तात्काळ विचार केला नाही.
तर पुढील काळात शेतकऱ्यांचा संघटनेच्या तीव्र रोशाला आपणांस सामोरे जावा लागेल. याची आपण नोंद घ्यावी. अन्यथा संघर्ष अटळ. वरील मागण्यांचा तात्काळ विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात अशा आशयाचे निवेदन जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांना दिले.
निवेदन देते वेळी सह्याद्री शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश शिंदे, मनसे शेतकरी सेने पुणे जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर निवेदन बाजार समितीचे प्रतिनिधी प्रशांत महाबरे यांनी स्वीकारले यावेळी धना,मेथी व्यापारी,आडतदार,धना,मेथी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
