सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केला संताप
1 min read
पुणे दि.२५:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावं. त्यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
की “सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं वरीष्ठांना वारंवार कळवलं होतं. परंतु, तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं.”
“या विषयाच्या मूळाशी नेमकं कोणतं कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे.
की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावं. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे.”
