मनोज जरांगे पाटील यांनी घेतली पंकजा मुंडेंची बाजू
1 min read
बीड दि.२४:- भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसींच्या मेळाव्यात केले होते.
त्यावर प्रतिक्रिया देताना बहीण-भावांमध्ये मिठाचा खडा टाकू नका, असा सल्ला ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी भुजबळांना दिला. आता त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनीच मुंडे घराण्यात राजकीय दरी निर्माण केल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार नसतील तर मग कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
