कोरोनाच्या काळात अहिल्यानगर मध्ये अवयव तस्करी
1 min read
अहिल्यानगर दि.२४:- करोनाचा संसर्गाचा बनावट चाचणी अहवाल,त्याआधारे वयोवृद्ध रुग्णावर उपचार सुरू असताना, त्यात त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची त्या काळात परस्पर विल्हेवाट लावली.रुग्णाच्या मुलाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून तोफखाना पोलिसांनी पाच डाॅक्टर आणि एक लॅब तंत्रज्ञ, असं सहा जणांविरोधात दाखल गुन्हा दाखल झाला.
शनिवार दाखल गुन्ह्यात आता डाॅ. गोपाळ बहुरूपी आणि डाॅ. सुधीर बोरकर यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपअधीक्षक डाॅ. दिलीप तिप्रसे यांनी आरोपांना सर्वोच्च न्यायालयाच्या गाइडलाइननुसार, जामीन मिळवण्याचा अधिकार आहे. आपला तपास सुरू आहे, असे सांगितले.
दाखल गुन्ह्यात, डाॅक्टरांपैकी डाॅ. गोपाळ बहुरूपी आणि डाॅ. सुधीर बोरकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. मात्र या दोन्ही डाॅक्टरांना (Doctor) दिलासा मिळू शकलेला नाही. या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून न्यायालयाने म्हणणे मागवले आहे.
फिर्यादी अशोक खोकराळे यांनी न्यायालयात (Court) स्वतःकडून वकील दिले आहेत. वकील अनिकेत कुल्लाळ आणि वकील योगेश नेमाने यांनी फिर्यादीच्यावतीने युक्तिवाद केला. न्यायाधीश एम. एच. शेख यांनी सरकारला म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्याचा आदेश दिला. न्यायालयाने या अर्जावर 28 ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे.
ऑगस्ट 2020 मधील करोना काळात वयोवृद्ध रुग्णाचा बनावट करोना अहवाल करून, त्याद्वारे चुकीचे उपचार केले. तसंच उपचाराचे अवाजवी बिल काढले.त्याची वसुली देखील केली. यातच रुग्ण दगावला. यानंतर त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. यावरून रुग्णाचा मुलगा फिर्यादी अशोक खोकराळे यांनी तक्रार केली.
उच्च न्यायालयाने तक्रारीची गंभीर दखल घेतल्यानंतर तोफखाना पोलिसांनी पाच डाॅक्टर आणि एक लॅब तंत्रज्ञ, अशा सहा जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. मानवी अवयवांची तस्करी करणे, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणे आदी मुद्यांवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जामीन अर्जावर हस्तक्षेप अर्ज
दरम्यान, या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आक्रमक झाले आहेत. डाॅक्टरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. याशिवाय गुन्हा दाखल होताच, या सर्व डाॅक्टरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
रुग्णांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
डाॅक्टरांची संघटना असलेल्या ‘आयएमए’च्या अहिल्यानगरमधील शाखेचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. डाॅक्टरांना या प्रकरणात गोवलं जात आहे. डाॅक्टरांवर अन्याय झाल्यास, रुग्णसेवा बंद आंदोलनाचा इशारा दिला. यावर देखील गिरीश जाधव यांनी पोलिसांकडे आयएमएच्या अहिल्यानगर शाखेचे पदाधिकारी अन् संघटनेवर बाॅम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली.
डाॅक्टरांच्या मुद्यावरून ठाकरेसेनेत धुसफूस
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून तणाव निर्माण झाला आहे. एकप्रकारने यावरून फूट पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर डाॅक्टर अन् त्यांच्या संघटनेला अंगावर घेणे परवडणारे नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यातून पक्षाच्या अहिल्यानगरमधील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे.
