जिव्हाळा नागरी पतसंस्थेकडून सभासदांना दीपावली भेटवस्तू वाटप
1 min read
मंचर दि.२२:- आंबेगाव तालुक्यातील अग्रगण्य मानली जाणारी जिव्हाळा नागरी पतसंस्थेच्या वतीने सभासदांची दिवाळी गोड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शंकर गोफणे सर आणि संचालक मंडळ उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात भेटवस्तू वाटप आणि लक्ष्मीपूजन कार्यक्रम करण्यात आला.
यावर्षी संस्थेने कर्ज वाटप आणि भाग भांडवल यात वाढ केली असून येथून पुढे संस्था नेहमीच सभासदांच्या पाठीमागे उभी राहील असे संस्थेचे अध्यक्ष शंकर गोफणे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर गोफणे, संचालक भारत दिवेकर, संचालक नागसेन शिशुपाल,
सल्लगार नारायण कामठे, कार्यकारी संचालक बबन सैद, सभासद बबन गाडगे,मीना चासकर,मीना सैद,व्यवस्थापक मयूर सैद, मेघा गुंजाळ, सायली भागडे, आदेश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
